लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्म २ जुलै १९२३ रोजी झाला.
लोकमतचे संस्थापक-संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि मंत्री म्हणून राज्यात विविध खात्यांची जबाबदारी ज्यांनी यशस्वीपणे हाताळली असे जवाहरलालजी दर्डा लोकमत परिवाराचे ते बाबूजी.
अत्रेसाहेब आणि बाबूजी विचारभिन्न, प्रकृतीभिन्न पण दोघांमध्ये समान धागा होता तो म्हणजे जे का हाती घेऊ ते झपाटून करायचे आहे.
‘लोकमत’चा आजचा वाढलेला प्रचंड पसारा पाहात असताना ५0 वर्षांपूर्वीची बाबूजींची दूरदृष्टी, त्यांचे कष्ट आणि पत्रकारितेतील समर्पण अशी बाबूजींची विविध रूपे उभी राहतात.
१९४२ साली स्वीकारलेला काँग्रेस पक्ष, १९४२ साली स्वीकारलेले खादी वस्त्राचे व्रत २५ नोव्हेंबर १९९७ पर्यंत म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी निष्ठेने जपले त्यांचे नाव बाबूजीच आहे. तुलनेकरिता म्हणून सांगत नाही. परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही दिग्गज नेत्याचे नाव घ्या… अगदी यशवंतराव, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, बॅ. अंतुले या पहिल्या फळीतील मोठ्या नेत्यांनी काही ना काही कारणामुळे काँग्रेस पक्ष सोडला होता.
२ जुलै १९९६च्या त्यांच्या वाढदिवशी मुंबईमध्ये मीच त्यांची एक मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी ठामपणे सांगितले होते की, ‘एकटा राहिलो तरी चालेल… काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन लढत राहीन.’
इंदिराजींनी १९७८ साली मुंबईच्या जाहीर सभेत सांगितले होते की, ‘विदर्भ मे मैं लोकमत के हत्यार से लढ रही हूँ’ बाबूजी त्याचवेळी हे स्पष्ट करायचे की मी आणि माझा लोकमत ४ वर्षे ११ महिने लोकांच्या सोबत आणि १ महिना पक्षासोबत. बाबूजींची ही तात्त्विक भूमिका होती.
लोकमतने महाराष्ट्रातील सर्वांत गरीब माणूस शोधून काढावा आणि त्याच्या मागे लोकमतने उभे राहावे. नागपूर लोकमत म्हणजे वडाचे झाड आहे. औरंगाबाद लोकमत हे पिंपळवृक्ष आहे या दोन वृक्षांच्या दहा शाखा आहेत.
जवाहरलाल दर्डा यांचे निधन २५ नोव्हेंबर १९९७ रोजी झाले.
Leave a Reply