मराठी सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला.
जयराम कुलकर्णी यांचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे गाव. जयराम कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने कॉलेज शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली.
कॉलेज शिक्षणा नंतर १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी लागली. नाटकात कामे करण्याची हौस असल्याने १९७० साली पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. शूटिंग मुंबई आणि कोल्हापूरला असल्याने नोकरीत अडचण येऊ लागली. त्यामुळे आकाशवाणीच्या नोकरीला रामराम ठोकावा लागला. आकाशवाणीत नोकरी करत असताना व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या बरोबरच ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्यापासून ते द. मिरासदार, आनंद यादव यांच्यापर्यंत अनेक दिग्गजांशी आकाशवाणीच्या नोकरीमध्ये संबंध आला व अनेक कलाकारांसोबत त्यांची ओळख झाली.
परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम कुलकर्णी यांनी साकारल्या.
जयराम कुलकर्णी यांच्या पत्नी आहेत डॉ हेमा कुलकर्णी, तर त्यांचा एक मुलगा रुचिर हा पेशाने वकील आहे. मृणाल देव- कुलकर्णी या जयराम कुलकर्णी यांच्या सून होत.
जयराम कुलकर्णी यांचे १७ मार्च २०२० रोजी निधन झाले.
Leave a Reply