जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर

जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ रोजी पुणे येथे झाला.

रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे अध्वर्यू ते मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले.

गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी जादूगार रघुवीर यांना पहिल्यांदा परदेश दौऱ्यावर नेले आणि तेथून त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. जादूगार रघुवीर यांनी आपल्या हयातीमध्ये ७ हजार २३ प्रयोग केले.

त्यांचे चिरंजीव विजय रघुवीर यांनी ६ हजार ३३० प्रयोग केले आहेत. जितेंद्र रघुवीर हे विजय रघुवीर यांचे चिरंजीव. बालपण व शिक्षण नुमवी प्रशालेत शिक्षण स.प. महाविद्यालय पुढे B.E. production engineering भारती विद्यापीठ पुणे पुण्यात झाले. नंतर उच्च शिक्षण अमेरिका येथे जाऊन एम.एस केले. जितेंद्र रघुवीर यांनी आपल्या शालेय शिक्षणा बरोबर वयाच्या ५ व्या वर्षांपासून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली.

जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲ‍काडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे.

जितेंद्र रघुवीर यांच्या पत्नी अश्विनी देशपांडे भोपळे यांनी एच आर मध्ये एम.बी.ए केले असून त्या स्वत: भरतनाट्यम डान्सर आहेत. त्यांचा मुलगा ईशान व मुलगी आणि तनिशा यांनी आपल्या वडीलांच्या कडून जादूचे प्रयोग शिकायला आणि करायला सुरवात केली आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*