कमलाकर सोनटक्के यांचा जन्म २ फेब्रुवारी १९३९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वडोद चैथा या एका लहान खेडेगावात झाला.
कमलाकर सोनटक्के हे नांव तसे मराठी -हिन्दी नाट्यश्रुष्टीशी खूपच निगडीत आहे. तसे म्हटले तर ह्या नाट्यकर्मींचे पाय जसे साहीत्य संघ मंदीरास लागत तसेच तें जे.जे. कला मंदीरास देखील लागत. त्याला कारण होती आमच्याकडील दोन माणसे. एक म्हणजे प्रत्यक्ष नाट्य क्षेत्राशी निगडीत असलेले नाट्यकर्मी प्रा. दामू केंकरे व दुसरें आमचे नाट्यप्रेमी प्रा. षांताराम पवार. या दोघांकडे बऱ्याच नाट्यकर्मींचे येणे जाणे असे.अश्यापैकीच एक नांव म्हणजे कमलाकर सोनटक्के.
कमलाकर सोनटक्के ह्या व्यक्तीला पाहील्यावरच त्यांचे भारदस्त व्यक्तीमत्व एखाद्यावर छाप पाडणारे होते. उंचापूरा देह. गौरवर्ण, डोक्यावर कुरळे केस, चेहऱ्यावर जाणवणारा खानदानी अन संस्कारी भाव आणि या सर्वावर कळस म्हणजे त्याचे इंदुरी लहेज असलेले अदबशीर बोलणे. जणू एखादा संस्थानिकच सामोरा आहे. असे वाटे की ऐतिहासीक चित्रपटातील नायकाचे काम करणारा अभिनेताच वाटावा असे. आणि प्रत्येकवेळी आल्यागेल्याचे ‘ जय हो!’ म्हणून केलेले प्रेमळ स्वागत. त्यामुळे एखादा प्रथमदर्शनीच त्यांच्या प्रेमात पडत असे.
दिल्लीमध्ये सोनटक्के यांचे खूप काम झाले होते. अनेक नाटके त्यांनी बसवली. एन.एस.डी. चे ते एक मुख्य घटक बनले होते. त्यांच्याकडे आणखी एक काम असे, ते म्हणजे परदेशी पाहुणे, नाटक, चित्रपट, पेंटींग, साहीत्य अश्या क्षेत्रांतील दिग्गज जेव्हां ही संस्था पहायला येत, तेव्हां त्यांना संपूर्ण संस्था दाखवुन तिची माहीती देणे. व सर्व पाहून संपल्यावर त्यांना अल्काझींच्या केबीन मध्ये आणणे.
दिल्ली येथे त्यांच्या राष्ट्रीय नाट्य शाळेत अभिनय व दिग्दर्शन करणारे विद्यार्थी प्रशिक्षणासाठी होते. तर मुंबईला मराठी साहीत्य संघात पहील्या महाराष्ट्र नाट्याभ्यास प्रशिक्षणाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी होते. मुंबईच्या इंडीयन नॅशनल थिएटरच्या बहुभाषी प्रवीण जोशी अकादमी मध्ये वेगळ्या रंगमंचीय अनुभवाचे विद्यार्थी होते. सोनटक्केनी राज्याच्या सांस्कृतीक धोरणात अनेक बदल केले. आजच्या नाट्यस्पर्धांतून हे अनेक अभिनेते मुख्य प्रवाहात पोचतात, त्या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन कसे असावे यांचे त्यांनी घालून दिलेले धडे आजही आचरणात आणले जातात. कांचन सोनटक्के या त्यांच्या पत्नी. त्या अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी काम करत असतात.
Leave a Reply