चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाट्यअभिनेत्री मा.लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर नाटकातील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला.
विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले.
सखाराम बाइंडर या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी ‘बाइंडरचे दिवस’ या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.
कमलाकर सारंग यांचे २५ सप्टेंबर १९९८ रोजी निधन झाले.
Leave a Reply