१९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक प्रसिद्ध करून मुहूर्तमेढ रोवणारे का र मित्र उर्फ काशिनाथ रघुनाथ आजगावकर जन्म २ नोव्हेंबर १८७१ रोजी आजगावमध्ये यांचा झाला.
काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांना बंगाली भाषा उत्तम येत होती आणि बंगाली संस्कृतीची चांगली माहिती होती. ते बंगाली साहित्याचे अनुवादक होते. त्यांनी १८९५ साली ‘मासिक मनोरंजन’ सुरू केलं आणि पुढे १९०९ साली ‘मासिक मनोरंजन’चा पहिला मराठी दिवाळी अंक काढला होता. काशिनाथ रघुनाथ आजगावकर हे त्यांचे मूळ नाव. बंगाली भाषेवरील प्रेमापोटी त्यांनी ‘मित्र’ हे आडनाव लावायला सुरुवात केली.
राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, केशवसुत, काशीबाई कानिटकर, वा. व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक त्यांनी जोडले होते.
वंगजागृति, धाकट्या सूनबाई, मृणालिनी, प्रियंवदा, लक्ष्मणमूर्च्छा, रामविलाप, गरीब बिचारी यमुना, ही रामाची अयोध्या, बाळंतपण असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
काशिनाथ रघुनाथ आजगावकर यांचे २३ जून १९२० रोजी निधन झाले.
Leave a Reply