केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. त्या मुळे त्याला लहानपणापासून पासूनच कलेची आवड होती. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी झाला.
त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात ‘बॉम्ब-ए-मेरी-जान’ या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये ‘आमच्या सारखे आम्हीच’, ‘मनोमनी’, श्रीमंत दामोदरपंत’, ‘तू तू मी मी’, विजय दिनानाथ चव्हाण’, ‘आता होऊनच जाऊ दे’, ‘सही रे सही’, ‘लोच्या झाला रे’, ‘गोपाला रे गोपाला’ ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत.
त्याचा पहिला चित्रपट ‘अगं बाई… अरेच्या’ म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच ‘आईटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती.
केदार शिंदेने दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये मुंबईत झाला. ‘नाटक ना नाटक नु नाटक’ असं या गुजराती नाटकाचे नाव असून ‘द प्ले दॅट गोज राँग’ या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा अधिकृत रिमेक आहे. बॉलिवूडस्टार शर्मन जोशीनं या नाटकाची निर्मिती केली आहे.
Leave a Reply