हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला.
केसरबाई केरकर या हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत. त्यांच्या मामांना गाण्याची आवड होती आणि केसरबाईंचे गाण्यातील गुण बघता ते त्यांना गावातील पुजाऱ्यांकडे गाणे शिकायला घेऊन जात.
पण तिथे फक्त भजने आणि कीर्तने शिकायला मिळतं म्हणून शेवटी ‘खरे’ गाणे शिकायला आठ वर्षांच्या केसरबाईंना त्यांचे मामा उस्ताद अब्दुल करीम खान साहेबांकडे कोल्हापूरला घेऊन गेले. पण पुढची १९ वर्षं त्यांच्या गान-तपश्चर्येत बाधाग्रस्तच होती. दर वेळेस कोणी चांगला गुरु लाभला की त्या गुरूस कोणी धनाढ्य आपल्या आश्रयाला दुसऱ्या गावी बोलावून घेई.
केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या.
कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने १९४८ साली केसरबाईंना ‘सूरश्री अशी पदवी बहाल केली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. महाराष्ट्र सरकारने त्यांना “राज्य गायिका” ह्या किताबाने गौरविले. रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते. रवींद्रनाथ टागोरांनी ‘सूरश्री’ किताब बहाल केला.
गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे.
केसरबाई केरकर यांचे १६ सप्टेंबर १९७७ रोजी निधन झाले.
Leave a Reply