ठाणे शहरातील ख्यातनाम चित्रकारांपैकी एक नाव म्हणजे केशव निवृत्ती कासार. चित्रकलेतील आपल्या वेगळ्या शैलीनं समस्त कला वर्तुळात आपला वेगळा ठसा केशव कासार यांनी उमटवला. पॉटरी, सिरॅमिक, लॅंडस्केप, पेंटींग, टेराकोटा, शिल्पकला ही त्यांची वैशिष्ट्ये होत.
पुण्याच्या अभिनव कलामहाविद्यालयातून जी.डी. आर्ट १९८७ साली, जे.जे. कला महाविद्यालयातून सिरॅमिक आणि पॉटरी या विषयात जी.डी. आर्ट १९८९ साली, कला शिक्षण पदविका आणि इंडोलॉजी विषयात एम.ए. असं शिक्षण केशव कासार यांनी घेतलं आहे. रॉबी डिसिल्वा दृश्य कला महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर अनेक कला महाविद्यालयात अधिव्याख्याता पद सांभाळून त्यांनी आपल्या कलेला आकार दिला. चित्रकला, मृद्कला इत्यादींचे प्रदर्शन भरवून त्यांनी आपली कला लोकांसमोर आणली. सध्या ते म्युरल आर्टिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या या प्रवासात त्यांना २८ व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनात उषा देशमुख सुवर्णपदक, इंडियन सिरॅमिक सोसायटीचे रोख बक्षीस असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
<!– – चित्रकार
गाव : भगुर, नाशिक
पत्ता : ई – १७/१५, मरोळ पोलीस कॅम्प, अंधेरी (पू) मुंबई ४०००५९
कार्यक्षेत्र : चित्रकार
भ्रमणध्वनी : ९८९२४५४९४१
ई-मेल : keshavkasar@gmail.com
–>
Leave a Reply