खंडेराव ऊर्फ ‘खंडू’ रांगणेकर हे ठाण्याचे आघाडीचे डावखुरे फलंदाज व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण होते. क्रिकेटपटु खंडेराव रांगणेकर यांचा जन्म २७ जूनला झाला.
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये अनेक जिगरबाज खेळी करून त्यांनी स्वत:चं पर्व गाजवून सोडले होते.
त्यानंतर १९४७ ते १९४८ या काळात भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया अशा तीन कसोटी सामन्यांमध्ये ते खेळले होते. उत्कृष्ठ तसंच आक्रमक फलंदाज, व पट्टीचे कौशल्यवान क्षेत्ररक्षक अशी त्यांची आशियाई देशांमध्ये ख्याती होती.खंडेराव रांगणेकर हे १९६० साली ठाणे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून होते.
खंडेराव रांगणेकर यांचे ११ ऑक्टोबर १९८४ रोजी निधन झाले.
Leave a Reply