रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्या असंख्य हिर्यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा
हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण. त्याचा जन्म ऑक्टोबर २१ रोजी सांगली येथे झाला.
रॉबर्ट बॉश जी. एम. बी. एच. ह्या, भारतामधील बॉश गटाला व्यावसायिक स्वातंत्र्याची व स्वायत्तेची हमी देणार्या, तसेच दिर्घकालीन गुंतवणुक करण्यासाठी व आर्थिक सुबत्ता देण्यासाठी बांधिल असलेल्या कंपनीमध्ये, उच्चपदस्थ असलेला हा तरूण मराठी मातीच्या पाण्याचा प्रत्यय सर्वाना आणून देत आहे. म्हणजेच त्याच्या कल्पकतेची व संशोधकपणे सुचविलेल्या उपाययोजनांची, तारीफ आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील केली गेली आहे. जे. डी. सी. बिट्को इनस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडिस अँड रिसर्च ह्या नामांकित शिक्षण संस्थेतून शिकल्यानंतर किरण बॉश ग्रुपशी कायमचा बांधला गेला.
Leave a Reply