नाट्य व चित्रपटसृष्टीत स्वत:च्या अभिनयाने एक वेगळी जागा लाभलेले किशोर चौघुले ह्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. बालनाट्य, पथनाट्य, लोकनाट्य असा प्रवास करीत नंतर राज्यस्तरीय एकांकिका, कामगार कल्याण तसेच राज्य नाट्य स्पर्धा केल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर “यदाकदाचित”, “यकृत”, “जागो मोहन प्यारे”, “प्यार किया तो डरना क्या”, “रामनगरी”, “पोपटपंची” सारखी अप्रतिम नाटके त्यांनी केली. ई-टिव्ही मराठीवरील कॉमेडी एक्सप्रेसमध्ये ते विनोदी अभिनेते म्हणून काम करत आहेत. मालिकांसोबत विविध चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. ज्यात “नो प्रॉब्लेम”, “इश्श”, “धुडगूस”, “नटरंग”, “सुपरस्टार” यामध्ये त्यांनी काम केले आहे. “गाजराची पुंगी”, “शर्यत”, “मसाज”, “गोळाबेरीज” हे काही सिनेमे नजीकच्या काळात पडद्यावर येत आहेत.
१९९९ पासून त्यांचा ठाण्याशी संबंध असून ते “यदाकदाचित” नाटकामुळे ठाण्याशी जोडले गेले. नंतर त्यांनी दत्त विजय प्रॉडक्शन मार्फत विविध नाटकांमधून भूमिका केल्या. ठाण्यातील गडकरी रंगायतन हे त्यांना मंदिरासारखे आहे असे ते म्हणतात.
पुरस्कार : त्यांना महा-राज्य नाट्य स्पर्धा (हौशी) रौप्य पदक “यकृत” २००३ म.रा.ना. स्प. (व्याव) रौप्य पदक, “जागो मोहन प्यारे” २००६ व “प्यार किया तो डरना क्या” २०१०, मटा सन्मान, नाटक (विनोदी अभिनेता) २०१०, २०११ प्यार किया तो डरना क्या आणि रामनगरी, सांस्कृतिक कला दर्पण अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
<!–
– अभिनेता
गाव : मु.पो. मोंडतर, ता. देवगड, सिंधुदुर्ग
पत्ता : सुप्रिया नंदकिशोर चौघुले, ५०६ बी विंग, शिव टॉवर, सिंग नगर, खोपट, ठाणे (प.)
कार्यक्षेत्र : नाटक, टि.व्हि., सिनेमा.
भ्रमणध्वनी : ९२२४१८५९२८
–>
Leave a Reply