‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट “ऐका दाजिबा’ यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षं त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पती दीपक बलराज वीज हे निर्माते आहेत. आता किशोरी शहाणे या ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. किशोरी शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Kishori Shahane
Leave a Reply