गोल्डन व्हॉइस’ अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी झाला.
‘बिब घ्या बिब शिककाई, परिकथेतील राजकुमारा, गोड गोजिरी लाज लाजिरी, अशा एकाहून एक अवीट गोडीच्या मराठी व २०० हून अधिक हिंदी गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या कृष्णा कल्ले या मूळच्या कारवारच्या. पण त्यांचे वडील कानपूर येथील नोकरीला होते. त्यामुळे त्यांचा जन्म आणि बालपण, शिक्षण कानपूरच्याच हिंदी भाषी प्रदेशात झाले.
कृष्णा कल्ले पुढे आकाशवाणीच्या ‘अ’ दर्जाच्या कलाकार झाल्या. सोबत उत्तर प्रदेशात होणा-या यात्रा-जत्रांतील संगीत कार्यक्रमातही यांचा आवाज लोकप्रिय ठरू लागला. एकदा मुंबईत नातेवाईकांकडे आल्या असताना कृष्णा कल्ले यांच्या आवाजातील निकोपता आणि निरागसता सर्वप्रथम ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या लक्षात आली.
जमाने से पूछो, टारझन और जादुई चिराग, प्रोफेसर और जादूगर, रास्त और मंजिलें आदी काही दुय्यम दर्जाच्या हिंदी चित्रपटांतही कृष्णा कल्ले यांनी गाणी गायली. कृष्णा यांनी मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी, मीनू पुरुषोत्तम, उषा तिमोथी आदी गायकांसोबतही गाणी गायली. त्यांनी ओ. पी. नय्यर, कल्याणजी-आनंदजी, मदन मोहन, जयदेव, शंकर जयकिशन आदी संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केले. त्यांनी १९६० तसेच १९७० च्या दशकात दोनशेहून अधिक हिंदी व शंभरहून मराठी गाणी गायली आहेत.
कृष्णा कल्ले यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.
त्यांचे पती मनोहर राय हे पण संगीतकार होते. कृष्णा कल्ले यांचे १५ मार्च २०१५ रोजी निधन झाले.
Leave a Reply