(जन्म १९३२)
व्यवसायाने स्थापत्य अभियंता. ४० वर्षे वास्तुविशारद, व्हॅल्युअर, स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणून काम. बिल्डिंग प्रॅक्टिस नावाचे इंग्रजी अनियतकालिक १२ वर्षे चालविले. १९६६ साली मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करून कार्यवाह, अध्यक्ष आणि विश्वस्त या पदांवरून परिषदेची भक्कम जुळणी करून दिली. अनेक शाखा स्थापन केल्या. वार्षिक संमेलने, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, विज्ञान भवन
यांची सुरुवात करून दिली. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात, त्यांचा एकमेकांत संफ राहावा म्हणून रोमन लिपी वापरावी अशा विचारातून रोम लिपी परिषद सुरू केली आणि ती चळवळ चालवली.
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
Leave a Reply