मुंबईचे निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर झेंडे यांचा जन्म ४ मार्च १९३८ रोजी झाला.
मुंबई पोलीस दलातील सर्वात प्रतिष्ठित माजी सहाय्यक आयुक्तांपैकी एक निरीक्षक मधुकर झेंडे. जवळजवळ ४० वर्षे पोलिस दलासाठी कार्यरत असताना, मधुकर झेंडे यांनी त्यांच्या काळात खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज, हाजी मस्तन आणि करीम लाला यांना जेल मध्ये टाकले. मधुकर झेंडे हे मुळचे पुण्याचे.
जेव्हा गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार देहलीच्या तिहार कारागृहातून फरार झाला होता. देशभरातील लोकांच्या तोंडी त्याचे नाव होते. बिकिनी किलर चार्ल्स शोभराज हाच तो माणूस ! तिहारच्या रखवालदारांना गुंगी आणणारे काहीतरी खाऊ घालून, हा कैदी सहीसलामत निसटला होता. चार्ल्स शोभराज हा विविध देशात अनेक गुन्हे करून फरार असलेला इंटरनेशनल क्रिमिनल होता.
विकृत स्वभावाच्या या गुन्हेगाराने गुन्हे देशात केले आणि तिथून निसटून सुद्धा आला. मग त्याला शोधून काढण्याचे आणि कह्यात घेण्याचे मोठे नाट्य रंगले होते. ज्यांनी त्याला सर्वप्रथम शिताफीने पकडले होते, त्याच एका ज्येष्ठ पोलीस अधिकार्याेवर ही कामगिरी सोपवली गेली. त्याचे नाव होते मधुकर झेंडे ! त्यांनीच मग सापळा लावून शोभराजला गोव्यात अटक केली होती.
मधुकर झेडे यांनी आपल्या कारकिर्दीवर गाथा शौर्याची हे पुस्तक लिहिले आहे.
Leave a Reply