डोक्यावर भरपूर वाढलेले अस्ताव्यस्त केस, शिडशिडीत अंगकाटी असलेला मकरंद देशपांडे म्हणजे अभिनयाचा बंदा रूपाया. त्यांचा जन्म ६ मार्च १९६६ रोजी रत्नागिरी येथे झाला.‘दगडी चाळ’ आणि ‘स्वदेश’, ‘सत्या’ ‘कयामत से कयामत तक’ या हिंदी सिनेमांसह अनेक मराठी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेते मकरंद देशपांडे यांचे दिग्दर्शन हे वेगळे असते. त्याचसोबत लूक, व हेअर स्टाईल यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख आहे.
मकरंद देशपांडे याच्या भूमिका असलेले चित्रपट रिस्क, डरना जरूरी है, हनन, एक से बढकर एक, स्वदेश, चमेली, विस्फोट, मकडी, लाल सलाम, रोड, प्यार दिवाना होता है, जंगल, घात, सरफरोश, सत्या, उडान, नाजायज, अंत, तडीपार, पहला नशा, सर इत्यादी. त्यांचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटात नुकताच येवून गेला.
‘दंडूपाल्या’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये त्यांची खलनायकाची भूमिका आहे. मकरंद देशपांडे यांनी अनेक नाटके लिहिली आहेत. त्यांची अंश नावाची थिएटर कंपनी आहे.
Leave a Reply