मालतीबाई विश्राम बेडेकर (विभावरी शिरुरकर)

मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका

(1905 – 2001)

मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ रोजी झाला.

त्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडिल: अनंतराव खरे).

त्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी १९३८ साली झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या.

स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम या लेखिकेनं स्वतच्या लिखाणातून केलं.

सरकारच्या शिक्षण -कल्याण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून काम करत असताना, तसंच `महिला सेवाग्रामशी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सहृदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दुःखी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दुःखालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता `विभावती शिरुरकर` या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं.

अलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा `कळयांचे निश्वास` हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. हिंदोळयावर` `विरलेले स्वप्ना` , `बळी` `जाई` , `शबरी`, या कादंबर्‍या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पारध` `हिरा जो भंगला नाही` , ही नाटकं, घराला मुकलेल्या स्त्रिया` हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन` हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे.

त्यांच्या `बळी` `शबरी ` आणि `घराला मुकलेल्या स्त्रिया` या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांची गुजराथीत भाषांतर झाली आहेत.

एकूण, स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचं लिखाण केल्यामुळे त्यांना बंडखोर लेखिका असं म्हटलं जातं.

# Maltibai Vishram Bedekar  (Vibhavari Shirurkar)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 Comment on मालतीबाई विश्राम बेडेकर (विभावरी शिरुरकर)

Leave a Reply

Your email address will not be published.


*