मनमोहन देसाई

मनमोहन देसाई यांचे वडिल किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते व बंधू सुभाष देसाई निर्माते होते.त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला.

मनमोहन देसाई यांना बॉलीवुड मध्ये मनजी या नावाने ओळखले जायचे. मनजीनी बॉलीवूड मधील सुरवात आपले बंधू निर्माते सुभाष देसाई याच्या ‘छलिया’ या चित्रपटापासून केली. मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ चित्रपट हिट झाले.

मनमोहन देसाई यांचे लग्न जीवनप्रभा देसाई यांच्या बरोबर झाले, पण १९७९ ला त्याच्या निधनानंतर त्यांचा अभिनेत्री नंदा यांच्या बरोबर साखरपुडा झाला पण ते लग्न होऊ शकले नाही.

मनमोहन देसाई यांचे १ मार्च १९९४ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*