ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात वावरत असताना, मनोज लासे यांनी ठाणे शहर अत्याधुनिक, अतिक्रमणरहित व हरित कसे राहील या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे शहरात रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, नियमित वीज पुरवठा यासारख्या मुलभूत सुविधा त्यांनी गतिमानरित्या पुरविलेल्या आहेत. ठाणे शहराला हरित बनवण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व स्वतःही कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण ठाणे शहराची काळजी घेताना त्यांनी गटारे, पदपथांचे काँक्रिटिकरण, पाणीगळती, व प्रत्येक चौकातील सुशोभिकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.
विद्यार्थ्यांपासून वयोवृध्दांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील लोकांच्या समस्यांना प्रत्यक्षात मदत करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. खारीगाव कळव्यातील राजपार्क सोसायटीजवळ वृध्दांसाठी अद्ययावत नाना नानी पार्क उभारले. शहरातील दळणवळण सुधारण्यासाठी सुसज्ज रस्त्यांना प्राधान्य देण्यासोबतच, खारेगांव येथील स्मशानभूमीचच्या दुरावस्थेमुळे उद्भवणार्या अनेक अडचणींची लक्षात घेत या स्मशानभूमीसाठी ५५ लाखांचा निधी उपललब्ध करून नुतनीकरणास सुरूवात केली.
त्याचप्रमाणे घोलाई भागातील पाणी, रस्ते, शौचालये आदी मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून, त्यांनी काही महिन्यांमध्येच या विभागाचा चेहरामोहरा पालटून दाखविला. सध्या या विभागामध्ये सुसज्ज रस्ते, पदपथावर दिवे, व घाणीचा निचरा करणार्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली आहे. या ठिकाणी विजेची समस्या असल्याने लासे यांच्या हस्तक्षेपामूळे येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळा क्रमांक ६८ चे नुतनीकरणही त्यांनी केले. वास्तू आनंद सोसायटी येथे सधीकरणासाठी धबधबा उभारल्याने हा भाग अधिक रमणीय झाला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply