मराठी व हिंदीतील चतुरस्त्र अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा जन्म २३ जुलै १९६१ रोजी झाला.
द्रोहकाल’, ‘फरेब’, ‘विरासत’ गॉडमदर’ यांसह इतर अनेक मराठी सिनेमांमधून मिलिंद गुणाजी आपल्याला परिचित आहे. यांसह अनेक ब्रँडसाठी ते मॉडेलिंग करतात.
महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही. भटकंतीमधले विचारही सुंदर आहेत. महाराष्ट्राचे वैभव असणारे गडकिल्ले लोकांनी बघावेत त्यांच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत हे विचारही अगदी पटणारे आहेत.
मिलिंद गुणाजी यांनी हिंदी, मराठी चित्रपटांबरोबर साऊथ इंडियन व इंग्रजी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. त्यांनी जवळपास २०० सिनेमातून कामे केली आहेत. मॉडेलिंग मुळे एक नवा विक्रम मिलिंद गुणाजी यांनी प्रस्थापित केला आहे. तो असा, की ते ब्रँड अँम्बेसिडर असलेल्या विविध कंपन्यांचे आठ होर्डिंग ‘मुंबई पुणे एक्स्प्रेस वे’वर लावण्यात आले आहेत.
मिलिंद गुणाजी यांच्या कविता आपल्याला http://www.milindgunaji.in/ या त्यांच्या वेब साईटवर बघता येईल.
Leave a Reply