एम्.ए./२५ वर्षं संगीत क्षेत्रात कार्यरत. हिंदुस्तानी संगीत व्हायोलीनवादक. भारत सरकारची संगीत साधनेसाठी शिष्यवृत्ती. सुरसिंगार संसदचा सूर-मणि पुरस्कार. पेंडसे म्युझिक अकादमी द्वारे संगीताचा प्रसार.
२५ वर्षे संगीत क्षेत्रात कार्यरत असलेले मोहन श्रीनिवास पेंडसे हे हिंदुस्तानी संगीत व्हायोलीन वादक आहेत. भारत सरकारची संगीत साधनेसाठी मिळणारी शिष्यवृत्ती त्यांनाही देण्यात आली आहे. वयाच्या ८ व्या वर्षापासूनच संगीताची आराधना करणार्या मोहन पेंडसे यांना सूर मणि पुरस्कारासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. त्यांचे परदेशात व्हायोलीन वादनाचे कार्यक्रम झाले. त्यांनी अनेक संगीत संमेलनातही वादन केले. गली १५ वर्षे ते पेंडसे म्युझिक अकादमी तर्फे हार्मोनिअम कीबोर्ड, मेंडोलिन, गिटार, व्हायोलिन यांचे प्रशिक्षण ते देत आहेत.
ठाण्यातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना सवलतीच्या अथवा शुल्क न आकारता मोफत प्रशिक्षण ते देतात. संगीताद्वारे अनेक नवीन कलाकार घडवणे व त्यांच्या कलागुणांना वाव देणारे तसेच संस्कृती जपणारी गुरुपौर्णिमा यांसारखे अनेक कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्याकडे त्यांचा कल आहे.
Leave a Reply