कवी मोरोपंत उर्फ मोरेश्वर रामचंद्र पराडकर हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. पन्हाळगड इथे पराडकर कुळात इ.स. १७२९ मध्ये मोरोपंतांचा जन्म झाला.
पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला.
वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरुन बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता.
सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणार्याम मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतानी ७५ हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे.
‘झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि ‘बालिश बहु बायकांत बडबडला’ ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.
मोरोपंत यांचे १५ एप्रिल १७९४ रोजी निधन झाले.
Leave a Reply