मुग्धा चिटणीस

दृष्ट लागण्या जोगे सारे’ हे गाणं आजही संगीत प्रेमींचं आवडतं गाणं… हे गाणं गुणगुणायला लागलं की, डोळ्या समोर येतात ती ट्रेनमधील ते नवं जोडपं. नव्या संसाराच्या स्वप्न उराशी बाळगून प्रवास करतात. १९८६ प्रदर्शित झालेला सिनेमा आजही जस्साच्या तस्सा आठवणारे अनेक प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अजिंक्य देवसोबत असलेल्या या अभिनेत्री नव्या जोडप्यांच उत्तम प्रतिनिधीत्व केलं होतं. ही देखणी अभिनेत्री म्हणजे मुग्धा चिटणीस. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला.

कमी लोकांना या अभिनेत्रीचं नाव माहीत आहे. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकरांनी गायलेली या सिनेमातील गाणी आजही लोकांच्या फेव्हरेट प्ले लिस्टमध्ये आपलं स्थान घट्ट करून आहेत. सिनेमांत अजिंक्य देवच्या आईची भूमिका दिवगंत अभिनेत्री रीमा लागू यांनी साकारली होती. सासू आणि सुनेचं नातं साकारणाऱ्या या दोघींनी तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा समोर मांडला होता. महत्त्वाची बाब म्हणजे मुग्धा चिटणीस या अभिनेत्री साकारलेला हा एकमेव सिनेमा.

मुग्धा चिटणीस यांचे उमेश घोडके यांच्याशी लग्न झाले होते.

१० एप्रिल १९९६ रोजी मुग्धा चिटणीस यांचे कॅन्सरने निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*