मुक्ता बर्वेचे वडील श्री वसंत बर्वे टेल्को कंपनीत नोकरी करत होते, तसेच आई विजया बर्वे या शिक्षिका तसेच नाट्यलेखिका होत्या. मोठा भाऊ देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे तसेच त्याने लहानपणी काही चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तिचा जन्म १७ मे १९८१ रोजी पिंपरी चिंचवड पुणे येथे झाला. रंगभूमीवरील मुक्ताची सुरुवात बालपणापासून झाली. मुक्तावर कलेचे संस्कार लहानपणापासून घरातूनच होत होते.
दहावीच्या परीक्षेनंतर “घर तिघांचे हवे” या रत्ना्कर मतकरी लिखित नाटकात मुक्ताने भूमिका साकारली. या नंतर नाटकाविषयी ओढ निर्माण झाल्याने त्यात करियर करायचे ठरविले. इयत्ता ११ आणि १२ वी चे शिक्षण सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे घेतले. यानंतर ललित कला केंद्र , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नाट्य शास्त्र विषयात पदवी घेतली आणि सोबतच ‘ड्रामा’ या विषयातून तिने बॅचलर डिग्री सुद्धा मिळवली आहे. १९९९ मध्ये ‘घडलंय बिघडलंय’ या कार्यक्रमातून मुक्ताने टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं.
प्रामुख्याने मराठी भाषिक चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. मुक्ताने काही हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. थांग, सावर रे, माती माय, एक डाव धोबी पछाड, बदाम राणी गुलाम चोर, ऐका दाजीबा, हायवे, मंगलाष्टक वन्स मोअर, जोगवा, मुंबई पुणे मुंबई, मुंबई पुणे मुंबई -२, डबल सिट असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मुक्ताने दिले. मुक्ताने घर तिघांचं असावं, देहभान, फायनल ड्राफ्ट, छापा काटा, रंग नवा, इंदिरा इ. नाटकात काम केले आहे.
२०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत.
Leave a Reply