एन. चंद्रा हे मुळचे गोव्याचे, एन.चंद्रा यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर नार्वेकर. त्यांचा जन्म ४ एप्रिल १९५२ रोजी झाला.
एन चंद्रा यांनी १०-११ वर्षे गुलजार यांच्या बरोबर ‘आंधी’, ‘कोशिश’, ‘खुशबू’, ‘मौसम’, ‘किनारा’, ‘किताब’, ‘नमकीन’, आदी चित्रपट केले.
एन. चंद्रा यांनी चित्रपटसृष्टीत संकलक, दिग्दर्शक, निर्माता, कथा व पटकथा लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय निरीक्षण सूक्ष्म असून ते परिणामकारकरित्या कथा, पटकथेत गुंफतात. त्यामुळे त्यांचे सुरवातीचे प्रतिघात, अंकुश, तेजाब हे चित्रपट आजही अपील होतात.
Leave a Reply