ना. धों. ताम्हनकर हे अवघ्या मराठी जगतात प्रसिद्ध आहेत ते गोट्या, चिंगी, दाजी अशा व्यक्तिरेखांचे जनक म्हणून. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८९३ रोजी झाला.
गेल्या शतकाच्या मध्यात त्यांनी निर्माण केलेल्या या त्यांच्या व्यक्तिरेखांनी अवघ्या महाराष्ट्राचं साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध केलं. नव्हे, त्या आपल्या घरातल्याच झाल्या आहेत. ना. धों. ताम्हनकर यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत सोपी भाषा आणि सामान्य माणसाला जणू त्याच्याच आयुष्यात घडणारे प्रसंग वाटावेत असे अगदी रोजच्या नेहमीच्या आयुष्यात घडणारे प्रसंग ते आपल्या पुस्तकांतून मांडतात.
आधुनिक मुलांच्या गोष्टींव्यतिरिक्त ताम्हनकरांनी अंकुश, अविक्षित, नारो महादेव, नीलांगी अशा ऐतिहासिक धाटणीच्या कथाही लिहिल्या होत्या. अंकुश, अविक्षित, बहिणभाऊ, मणी, नारो महादेव, नीलांगी, रत्नाकर, चकमकी अवती भवतीच्या, गोट्या भाग १ ते ५, खडकावरला अंकुर, चिंगी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
ना. धों. ताम्हनकर यांचे ५ जानेवारी १९६१ रोजी निधन झाले.
Leave a Reply