नाना साहेब पेशवे

बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे यांचा जन्म १९ मे १८२४ रोजी झाला. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते. थोरले बाजीराव यांच्या नंतर शाहू महाराजांनी त्यांना मराठा साम्राज्याचे पेशवे बनवले. त्यांच्याच काळात मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले. नानासाहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी मोठे योगदान दिले. मराठ्यांच्या इतिहासात सर्वाधिक काळ पेशवेपदावर राहण्याची कामगिरी नानासाहेब पेशव्यांच्या नावावर आहे.

२५ जुन १७४० रोजी छत्रपती शाहू महाराजांनी सातारा दरबारी नानासाहेबांना पेशवाईची वस्त्रे प्रदान केली. त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने उत्तर भारतात जरब बसवली. १७६० च्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य ताकत बनली. परंतु १७६१ च्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा नानासाहेब पेशवे यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा ठरला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्या धक्काने त्यांचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला १६३६ ते १७५७ दरम्यान स्वराज्यात नव्हता. नानासाहेब पेशव्यांनी मुत्सद्दीपणाने कोणत्याही लढाई शिवाय शिवनेरी स्वराज्यात घेतला.

नानासाहेबांचा शत्रूला किती वचक, धाक व विश्वास होता हे पोर्तुगीज, इंग्रज, निजाम, अहमदशहा अब्दाली व मोगल दरबार यांच्या पत्रांवरून स्पष्ट दिसून येतो. राज्यकर्ता हा केवळ आक्रमक दिसून चालत नाही तर तो विश्वासूही दिसावा आणि असावा लागतो. नानासाहेबांच्या विश्वासनियतेची दोन जबरदस्त उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी नानासाहेबांस पेशवाईची वंशपरंपरागत दिलेली सनद व दिल्लीच्या बादशहाने स्वसंरक्षणार्थ केलाला अहमदीया करार.

पेशवा या पदावरील व्यक्तिच्या जबाबदार्‍या शिवछत्रपतींच्या ‘कानुन जाबता’ मध्ये स्पष्ट केल्या आहेत. नानासाहेबांनी त्याचे तंतोतंत पालन करून नियोजनबद्ध पध्दतीने स्वराज्याचा केवळ विस्तारच केला नाही, तर स्वराज्य आर्थिक दृष्या मजबूत केले.

सर्वात महत्वाचे म्हणजे भारतातील सर्व समाज समावेशक धोरण अनुसरून स्वराज्य सार्वभौम केले. नानासाहेब पेशवे यांचे २३ जून १७६१ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*