मुख्यमंत्रीपदाच्या थोड्या काळातही त्यांनी महाराष्ट्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पाडली आहे.
राज्यातील शासकीय कर्मचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षांवरुन ५८ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय त्यांनी घेतला. राज्यातील बहुसंख्य तरुणांना त्याचा लाभ झाला. नारायण राणे यांच्याच कारकिर्दीत राज्यात “जिजामाता महिला आधार विमा योजना”, “बळीराजा संरक्षण विमा योजना” यांसारख्या योजना सुरु करण्यात आल्या. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरु करुन त्यांच्या शिक्षणाची कायमस्वरुपी सोय करण्यात आली. राज्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना मिळणारा जकात कर रद्द करण्यात आला. हिंगोली व गोंदिया या दोन नवीन जिल्ह्यांसह २८ नवीन तालुक्यांची निर्मिती करण्यात आली. पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय घेऊन सर्वसामान्य ग्राहकाला संरक्षण देण्यात आले. याच काळात पर्यटन क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देण्यात आला.
नारायण राणे यांच्याच काळात १९९९ हे वर्ष माहिती तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित करुन राज्याचे स्वत:चे माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर करण्यात आले.
त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला. आज ते महाराष्ट्रातील कॉंग्रसचे एक महत्त्वाचे नेते आहेत.
Leave a Reply