पावसकर, नरेंद्र केशव

पावसकर नरेंद्र

नरेंद्र पावसकर यांचे शालेय शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कुलमधून झाले आणि उच्च कला शिक्षण हे जे.जे. स्कुल ऑफ आर्ट, मुंबई मधून झाले. १९५९ ते १९७३ ह्या काळात माध्यमिक शाळेत कला शिक्षक म्हणून ते काम करत होते. १९७४ ते १९९६ दरम्यान ते राज्य कला संचालयनालयांतर्गत राज्याचे कलाशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. शासकीय सेवेत असताना १९९० साली पहिले एकल चित्रप्रदर्शन मुख्यमंत्रीनिधीसाठी भरवले व १९९६ पासून १० एकल चित्रप्रदर्शन व अनेक गट प्रदर्शने त्यांनी भरविली आहेत. सेवानिवृत्तीकाळात २००१ पासून संस्कार भारती, ठाणे कला विभागाचा चित्रकला प्रमुख व उपाध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटी माजी समिती सदस्य व आर्टिस्ट सेंटर, मुंबई अशा अनेक संस्थांची गेली अनेक वर्षे सहसचिव, तसेच अनेक चित्रकला स्पर्धांसाठी परिक्षक म्हणून कार्य करत आहेत.

ठाण्यासाठीसुद्धा नरेंद्र पावसकरांनी खूप मोठं योगदान दिलं आहे. वादळग्रस्त ठाणे जिल्ह्याच्या मदतीसाठी आयोजित चित्रकला प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*