काकासाहेब गाडगीळ हे राजकीय नेते म्हणून ओळख असणारे वैचारिक लेखक होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १८९६ रोजी झाला. ग्यानबाचे अर्थशास्त्र, राज्यशास्त्रविचार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. १९६२ साली साताऱ्याला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
देशासाठी काकासाहेब गाडगीळ यांनी खूप काम केले पण कामाची प्रसिद्धी कधीही केली नाही. गंमतीचा भाग म्हणजे ‘प्रसिद्धीविना काम म्हणजे अंधारात मुलीला डोळा मारल्यासारखे आहे’ हे काकासाहेब गाडगीळ यांचे वाक्य प्रा. रामकृष्ण मोरे काँग्रेसच्या अनेक शिबीरातून सांगायचे. पुण्यातील एन.डी.ए. म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनी ही सुरुवातीला दक्षिण भारतात उभारण्याची कल्पना होती.
पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे.
लेखक या बरोबरच काकासाहेब गाडगीळ यांची राजकिय कारकिर्द मोठी होती. भारत सरकारने टपाल तिकीट प्रसिध्द केले होते. काकासाहेब गाडगीळ यांचे १२ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.
Leave a Reply