नितीन पायतोडे हे मूळचे नागपूरचे पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर. चित्रपट, नाटकं यामध्ये विशेष आवड असणार्या नितीन यांनी अविष्कार या हौशी नाट्य संस्थेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अविष्कार साठी त्यांनी “भूतम्”, “जंगल”, या नाटकांसाठी कामं केली आहेत.
या नाटकासाठी त्यांनी सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे धडे गिरवले. विशेष म्हणजे नितीन यांचा वावर हा “डबिंग आर्टिस्ट”, “रंगभूमी वरील नाटक”, “टिव्ही मालिका”, “चित्रपट”, “आकाशवाणी” अशा विविध कला प्रांगणात होत राहिला आहे. “कामा पुरता विमा”, “दाह” या मराठी चित्रपटांमधून अभिनय, तर “क्षण”, “उलाढाल”, “वासुदेव बळवंत फडके”, “फॉरेनची पाटलीण”, या चित्रपटासाठी त्यांनी डबिंग केलं आहे.
आकाशवाणी मुंबई केंद्रावर निर्मिती सहाय्यक, उदघोषक, व “रेडिओजॉकी” सोबतच लेमन न्युज या वृत्त वाहिनीवर वृत्तवाहिनीवर वृत्तविवेदक म्हणून ही नितीन पायतोडे यांनी श्राव्यच्या क्षेत्रात ठसा उमटवला आहे.
Leave a Reply