पल्लवी जोशी यांनी लहान वयात रंगमंचात काम करणं सुरु केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का नावाचे दोन चित्रपटात अभिनय केला होता.
त्यांचा जन्म ४ एप्रिल १९६९ रोजी झाला. त्यांनी १९७९ साली आलेल्या झालेल्या दादा ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये काम केली ज्या मध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख होता.
पल्लवी जोशी यांनी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून “सा रे ग म’ करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता.
“रिटा’ हा मराठी चित्रपट त्यांनी केला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या “बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटात ती अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका केली होती. “सौदागर’, “तेहलका’ मध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. श्याम बेनेगल यांच्या “मेकिंग ऑफ महात्मा’ मध्येही त्यांनी काम केले होते.
“वो छोकरी’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. टीव्हीवरही “जुस्तजू’, “अल्पविराम’ या त्यांच्या मालिका खूप गाजल्या.
Leave a Reply