पं. दिनकर पणशीकर

जयपूर अत्रोली घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. दिनकर पणशीकर आणि शिक्षक यांचा जन्म १९३६ साली मुंबई येथे झाला.

गोव्याचे सुपुत्र असलेले पंडित दिनकर पणशीकर हे नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे धाकटे बंधू होते. घरामध्येच कलेचं वातावरण असल्यामुळे त्यांचा ओढाही कलेकडेच होता. गुजरातमधील पाटण येथे दत्तात्रय कुंटे यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

‘कट्यार काळजात घुसली’ नाटकात पं. वसंतराव देशपांडे यांच्यासमवेत भूमिका साकारण्याची संधी पं. दिनकर पणशीकरांना लाभली. ‘आडा चौताला’ सारख्या कमी प्रचलित तालात त्यांनी रचलेल्या २०० बंदिशी हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत क्षेत्रासाठी बहुमूल्य ठेवा मानला जातो.

गोवा कला अकादमीचे ते ‘संगीत विभाग प्रमुख’ होते. शेकडो शिष्य त्यांनी घडवले.गोवा राज्य पुरस्कार, कोलकाता संगीत रिसर्च अकादमी पुरस्कारासह षडाक्षरी गवई, गानवर्धन, चतुरंग संगीत कला पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०१७ साली केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे त्यांना पाठ्यवृत्ती मिळाली होती.पंडित दिनकर पणशीकर यांचा फार मोठा शिष्य वर्ग आहे. अंबरनाथ संगीत सभेचे ते संस्थापक सदस्य होते.

पं.दिनकर पणशीकर यांना शंतनू आणि भूपाल ही दोन मुले आहेत. शंतनू तबलावादक तर भूपाल सतारवादक आणि गायक म्हणून कार्यरत आहे.

पं.दिनकर पणशीकर यांचे निधन २ नोव्हेंबर झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*