पं.जगन्नाथबुवा पुरोहित

ज्येष्ठ गायक पं.जगन्नाथबुवा पुरोहित हे आग्रा घराण्याचे गवई, बंदिशकार, तबलावादक. पं.जगन्नाथबुवा पुरोहित हे ‘गुणीदास’ या टोपणनावाने बंदिशी करत असत.

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचा जन्म १२ मार्च १९०४ रोजी झाला.

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.  पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या शिष्यांच्या मध्ये राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, जितेन्द्र अभिषेकी, सी.आर्.व्यास, यशवंतबुवा जोशी, वसंतराव कुलकर्णी, लीलाताई करंबेळकर, मनोरमा वागळे, मोहनतारा अजिंक्य, जी.एन्.जोशी, मन्ना डे, आणि तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे! अशी अनेक दिग्गजाची नावे होती.

हे असं अडीच तीन तास विनाखंड चाललं. तीच चीज, तोच ताल आणि तीच लय!

शेवटी बुवांनी थांबवलं. बुवा उठले, मोहनरावांचे कौतुक केले आणि दमला असशील म्हणत स्वतः खांदे रगडून दिले! खाऊ घातलं आणि आज्ञा केली, राम, जा, याला पुण्याच्या गाडीत नीट बसवून दे आणि परत ये!

पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे निधन १९६८ साली झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*