पं. मधुकर दीक्षित

वडिलोपार्जित त्यांचा भिक्षुकी व्यवसाय होता. त्यांच्या कुटुंबात कोणतीही संगीताची पूर्वपीठिका नसताना त्यांना बालवयातच संगीताची आवड निर्माण झाली होती. त्यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९३५ रोजी वाराणसी येथे झाला. परंतु, कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांची सतार वादनाची आवड लक्षात घेऊन त्यांच्या वडील बंधूनी त्यांना त्या काळी सतार विकत घेण्यास ३५ रुपयांची मदत करून, त्यांना सतार शिकण्यास प्रोत्साहित केले. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील तत्कालीन नामांकित सतारवादक पं. ज्योतीशचंद्र चौधरी या गुरूंकडे सतार शिकण्यास सुरुवात केली. पं. ज्योतीशचंद्र चौधरी हे त्यांचे आद्यगुरू.

दीक्षित हे पं. ज्योतीशचंद्र चौधरी यांचे शिष्य असल्याने, खाँसाहेबांना त्यांना शिष्य करून घेण्यास, अडचण वाटली नाही. तेव्हापासून उस्ताद विलायत खाँसाहेबांनी त्यांना शिष्य केले. मुंबईत त्यांचे कोणीही नसल्याने व आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने, त्यांची मुंबईत राहण्याची सोय होऊ शकली नाही. परिणामी, खाँसाहेबांनी त्यांना त्यांच्याकडेच आसरा दिला. खाँसाहेबांचे तत्कालीन निकटवर्ती असलेल्या शिष्य गणांपैकी पं. अरविंद पारिख, पं. गिरीराज सिंह तथा पं. हरिशंकर पुराणिक हे सर्व दीक्षितांचे गुरूबंधू होत. पं. दीक्षित हे उस्ताद खाँसाहेबांचे विश्वासू शिष्य म्हणून गणले जात. पं. दीक्षित बरीच वर्षे खाँसाहेबांच्या सान्निध्यात राहिल्याने खाँसाहेबांच्या सतार वादनातील गायकी अंग व त्यामधील बरेच बारकावे ज्ञात झाल्याने ते त्यांनी बऱ्यापैकी आत्मसात केले होते. त्यामुळे दीक्षित यांच्या सतार वादनात खाँसाहेबांचा पगडा भासत असे.

त्यांचा मुलगा श्री मिथिलेश दीक्षित यालाही त्यांनी सतारीचे धडे दिले, तो उत्तम सतार वादन करतो. पं. मधुकर दीक्षित यांचे २ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*