पंडित निवृत्तीबुवा सरनाईक

निवृत्तीबुवा सरनाईक जयपूर-अत्रौली घराण्याचे मराठी गायक होते. त्यांचा जन्म ४ जुलै १९१२ रोजी झाला. निवृत्तीबुवांनी संगीताचे प्रारंभिक शिक्षण गोविंद विठ्ठल भावे व आपले काका शंकरराव सरनाईक यांचेकडून घेतले. त्यानंतरचे सांगीतिक शिक्षण त्यांनी रजब अली खान व सवाई गंधर्व यांचेकडे घेतले. त्यांच्या गायकीवर सर्वाधिक प्रभाव त्यांचे संगीत गुरू व जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक अल्लादिया खान साहेब यांचा होता. पुढे त्यांनी त्याच शैलीत आपले गायन विकसित केले.

१९७८ मध्ये त्यांनी कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत निवासी संगीत गुरू म्हणून काम बघण्यास सुरुवात केली.

१६ फेब्रुवारी १९९४ रोजी निवृत्तीबुवा सरनाईक यांचे निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*