पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांचा जन्म ११ जून रोजी झाला. बालगंधर्वांच्या नाटक मंडळींमध्ये बालपण व्यतीत केलेल्या वालावलकरांनी बालगंधर्वांपासून ते पंडित भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास, शोभा गुर्टू अशा दिग्गज कलाकारांना संवादिनीची साथ केली होती. गोविंदराव टेंबे, विठ्ठलराव कोरगावकर अशा बुजुर्ग मंडळीकडे त्यांनी शिक्षण घेतले होते. गंधर्व युगाशी आजच्या पिढीचे नाते जोडणारा दुवा म्हणूनही वालावलकर यांच्याकडे आदराने पाहिले जात होते. संवादिनीवर सहजपणे फिरणार्या त्यांच्या बोटांनी रसिक मनांवरं अक्षरश: गारुड घातले होते. बेळगावमधील प्रख्यात हामोर्नियमवादक पं.रामभाऊ विजापुरे यांच्या हस्ते वालावलकर यांना स्वरगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला होता शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये संवादिनीला मानाचे स्थान मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेले पं. पुरुषोत्तम वालावलकर यांचे १३ जानेवारी २०१४ या दिवशी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ९० वर्षे होतं.
वालावलकर, पं. पुरुषोत्तम
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
Leave a Reply