स्त्रियांच्या विशेषतः पतिता व विधवांच्या सर्वांगीण उध्दाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी.
लक्ष्मीबाई ऊर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता पिता तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोर जवळ माहेरंजी येथे राहणार्या हया चित्तपावन ब्राम्हण दांपत्याच्या पोटी माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईच्या जन्म झाला. अनंत शास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाई व रमाबाईस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करुन दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले.
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रुढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा‘ची स्थापना केली. स्त्रीधर्मनिती हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले. १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उध्दाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टीकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरीक श्रमाचे महत्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. मुक्तिसदना’त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साहयाने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ साली रमाबाईना त्यांच्या हया कार्याबद्दल कैसर ई हिंद हे सुवर्ण पदक मिळाले.
जन्म : २३ एप्रिल १८५८
मृत्यू : ५ एप्रिल १९२२
बाह्य दुवे :
Nice work ….I really motivated .
thanks need to know more details, atleast her full name.
Nicely