पांडुरंग महादेव बापट (सेनापती बापट)

क्रांतिकारक, समाजसेवक

सशस्त्र क्रांतिकारक, तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक पांडुरंग महादेव बापट 1921 ते 1924 या कालखंडात पुणे जिल्हयातील मुळशी पेटयात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱयांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला, त्यामूळे सेनापती बापट या शब्दावलीने ते ओळखले जाऊ लागले. अहमदनगर जिल्हयातील पारनेर येथे गरीब कुटूंबात १२ नोव्हेंबर १८८० रोजी त्यांचा जन्म झाला. आईचे नाव गंगाबाई. माध्यमिक आणि बी.ए. पर्यतचे उच्च शिक्षण मुख्यत्वे करून पुणे येथे झाले. डेक्कन कॉलेजमध्ये सशस्त्र क्रांतीच्याद्वारे भारत स्वंतत्र करण्याची शपथ तलवारीवर हात ठेवून घेतली.

बी. ए. परीक्षेत 1903 साली उत्तीर्ण झाल्यावर मुबंई विद्यापिठाची शिष्यतृत्ती मिळवुन ते इंग्लंडला गेले एडिंबरो येथे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतानाच क्रांतिकारक विचारांचा प्रचार करीत असल्यामूळे शिष्यवृत्ती बंद होऊन शिक्षण अपुरे राहीले श्यामजी कृष्ण वर्मा या क्रांतिकाराक नेत्याशी परिचय होऊन त्यांच्या मदतीने पॅरिस येथ्íा राहून तेथील रशियन क्रांतिकारकांकडून प्रचंड स्फोटक बॉम्बची तंत्रविद्या हस्तगत केली. त्या तंत्रविद्येची पुस्तिका भारतात व बंगालमधील क्रांतिकारक गटांपर्यत पोहोचविली क्रांतिकारकांच्या कटाच्या एका खटल्यात माफीच्या साक्षीदाराचे बापटांचे नाव उघडकिस आणल्यामूळे बापट हे 1908 ते 1912 पर्यत चार वर्षे अज्ञातवासात राहिले.

नंतर 1921 पर्यत स्वतच्या जन्मगावी शिक्षक म्हणून राहिले आणि समाजसेवा व्रत घेतले. पहाटे उठल्याबरोबर गावचे रस्ते झाडणे व शौचकूप साफ करणे हे व्रत त्यांनी जन्मभर स्वीकारले 1921 ते 1924 या कालखंडात पूणे जिल्हयातील मुळशी पेटा येथील धरणग्रस्त शेतकऱयांना जमीन मिळविण्याकरिता सत्याग्रहाचे आंदोलन चालविले या आंदोलनात कारागृहावासाची तीनदा शिक्षा त्यांना झाली. शेवटची सात वर्षे सक्तमजुरीची होती. राजकिय स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये भाग घेत असतांना राजदोहात्मक भाषणे केल्याबदल अनेकदा अनेक वर्षे सक्तमजूरीची शिक्षा झाली. संस्थानाची प्रजांच्या हक्कांकरिता चालु असलेल्या आंदोलनात भाग घेऊन संस्थानच्या प्रवेशबंद्या त्यांनी मोडल्या त्याबदल कारागृहवासही सोसला. स्वातंत्र्योत्तरकाळातही भाववाढ विरोधी ओदोलन गोवामुक्ती आंदोलन संयुक्त महाराष्ट्र आंदोलन इ. ओदोलनांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला.

सेनापती बापट यांचे निधन २८ नोव्हेंबर १९६७ झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*