पराग करंदीकर हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द व प्रथितयश पत्रकार असून महाराष्ट्र टाईम्स, सकाळसारख्या नामांकित व पुणे-मुंबईसारख्या महानगरांमधील नागरिकांचे मतप्रवाह ठरविणार्या वृत्तपत्रांसाठी वृत्तसंकलनाचे काम करून त्यांनी या क्षेत्रातील विपुल अनुभव गाठीशी जमविलेला आहे. आपल्या आभ्यासपुर्ण लेखनाचा व अचुक माहिती संकलनाचा सुरेख संगम करीत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा अगदी ठसठशीत ठसा त्यांनी उमटविला आहे.
करंदीकरांचे शैक्षणिक आलेख बघितला, तरी त्यांच्या आतील अष्टपैलु व सृजनशील विद्यार्थ्याची सहज प्रचिती येईल, इतक्या विभीन्न प्रातांना व पाउलवाटांना एक विद्यार्थी म्हणून चोखंदळले आहे. ‘डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरींग’ हा कोर्स करून एका इंजिनीअराची प्राथमिक घडण, आर्टस क्षेत्राती राज्यशास्त्र या विषयातील पदवी मिळविलेला पदवीधर, व रानडे इन्स्टिट्युट मधून ‘मास्टर्स इन जर्नालिसम अँड कम्युनिकेशन’ ही पत्रकारिता कौशल्यांना सबळ व सक्षम करणारी डिग्री मिळविणारा तज्ञ, अशी एक विद्यार्थी म्हणूनच त्यांची मुळे फार खोलवर रूतलेली आहेत.
कस्रो वाडिया इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रथितयश संस्थेमधून ते डिप्लोमा इंजिनीअर झाले तर परशुराम भाऊ कॉलेज पुणे या नामांकित कॉलेजमधून कला क्षेत्रातील पदवीधर झाले. त्यांच्यातील खर्या पत्रकाराची जडण घडण तर कॉलेजच्या दिवसांपासूनच झाली. पत्रकारिता हे त्यांच व्रत आहे, अन्यायाला तोंड फोडण्यासाठी त्यांनी निवडलेलं शस्त्र आहे हे त्यांच्या आतापर्यंतच्या अत्यंत तत्पर व पारदर्शी वाटचालीमधून सिध्द होतं आलयं. कॉलेजच्या दिवसांपासून त्यांच्या हाताला चिकटलेली लेखणी आजवर कधीही म्यानस्थ झालेली नाही. उलट ती आजच्या आव्हानात्मक व भ्रष्टाचाराने वेढलेल्या जगामध्ये अधिकच तावून सुलाखून निघालेली आहे. निर्भीड विचारसणीचे व विज्ञानवादी दृष्टीकोनाचे पुरस्कर्ते असलेल्या करंदीकरांनी साहाय्यकारी संपादक पुणे शहर, सकाळ मिडिया ग्रुप येथे, सकाळ पेपर्स लिमीटेड साठी अहवालकर्ता म्हणून, तर सकाळसाठीच क्रिडा विभागाचे उपसंपादक व प्रमुख रिपोर्टर म्हणून काम केले आहे. आपले पदव्योत्तर शिक्षण त्यांनी एन. एम. व्ही. कॉलेजमधुन पुर्ण केले.
Leave a Reply