१९२४ पासून त्यांनी अनेक मूकपटांत भूमिका केल्या तसेच काही मूकपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे झाला. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ इ. चित्रपट संस्थांमधून नट व दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामे केली. अनेक हिंदी, मराठी तसेच कन्नड व तमिळ बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शक या नात्याने काम केले.
कालांतराने ‘रेडिओ स्टार्स’ ही संस्था सोडून आळतेकरांनी ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेत नट व सहकारी अशा नात्यांनी नाट्यविषयक मौलिक कार्य केले. पुढे त्यांनी ‘नॅशनल थिएटर अॅतकॅडमी’ ही नाट्याभिनयाचे व आवाज जोपासण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था चालविली.
रंगभूमीवरील त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी),‘बापूसाहेब’ (रंभा) वगैरेंचा उल्लेख करता येईल.
आळतेकरांच्या स्मरणार्थ ‘अभिनय’ या संस्थेमार्फत मुंबईच्या परिसरातील हौशी नाट्यसंस्थांसाठी १९६४ पासून नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. पार्श्वनाथ आळतेकर यांचे कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
Leave a Reply