नाटक, मालिका व चित्रपटांमधून रसिकांचे मन जिंकणार्या अभिनेत्री पौर्णिमा अहिरे केंडे यांचे देखील सांस्कृतिक क्षेत्रात ठाण्याचं नाव उज्वल करण्यासाठी मोलाचं योगदान आहे.
“यदाकदाचित”, “श्यामची मम्मी”, “वन टू का फोर”, “जाऊ बाई जोरात”, इत्यादी दर्जेदार विनोदी नाटकांत; “रामनगरी”, “सुखांशी भांडतो आम्ही”, यांसारखी आशयधन नाटकं तसेच “वहिनी साहेब”, “अवघाची संसार”, “कळत नकळत”, व “या सुखांनो या” इत्यादी “झी मराठी” वरील मालिका व “अगं बाई अरेच्चा”, “डोंबिवली फास्ट”, “पछाडलेला”, “धुडगूस” व “चश्मेबहाद्दर” यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
अभिनय क्षेत्रातील दर्जेदार कामगिरीसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद तर्फे सोनुबाई दादु इंदुरीकर पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले, तसेच “राम नगरी” या नाटकासाठी लक्षवेधी विनोदी अभिनेत्री २०११ चा संस्कृती कला दर्पण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
Leave a Reply