१९७८ पासून रंगभूमी, मालिका, चित्रपट, लघुपट, जाहिराती या क्षत्राशी निगडीत असलेलं व आजवर ५ नाटकं १३ हून अधिक हिंदी व मराठी मालिकांमध्ये भूमिका आणि दिग्दर्शन केलेलं सर्व परिचित नाव म्हणजे प्रबोध कुलकर्णी हे होय !
राज्य नाट्य स्पर्धा, युवा महोत्सव, आय.एन.टी., उन्मेष इत्यादी महाविद्यालयीन आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांतूनही त्यांनी अभिनय आणि दिग्दर्शनात आपला ठसा उमटवला. आजपर्यंत त्यांनी “संध्याछाया”, “गर्भश्रीमंत”, “जंगली कबूतर”, “चारचौघी” या नाटकांमध्ये :आणि “चार दिवस सासुचे”, “उंबरठा”, “दामिनी”, “अकल्पित” यांसारख्या मराठी मालिका, “एलआयसी”, “टाटा टी” या जाहिराती केलेल्या आहेत.
शालेय जीवनापासूनच प्रबोध कुलकर्णी यांनी आंतरशालेय स्पर्धांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवायला सुरुवात केली. १९८१ साली कै. वसंतराव देशपांडे यांच्या हातून आणि १९८२ साली सुशिलकुमार शिंदे यांच्या हातून अभिनयाचे पदक मिळवून प्रबोध कुलकर्णी यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
Leave a Reply