आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच जन्म १ जानेवारी १९३४ रोजी बांदोडा-गोवा येथे झाला. प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या.
प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांची असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. प्रफुल्लाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेच्या मासिकासाठी तिने काढलेली चित्रे बघून वडिलांनी तिला कलाशिक्षणासाठी ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल केले.
फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्विर्त्झलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती. भारतीय दूतावासाने तब्बल तीन वेळा लंडनमध्ये डहाणूकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजीत केले होते. ही तिन्ही प्रदर्शने कलाविश्वात कौतुकास पात्र ठरली होती.
प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन १ मार्च २०१४ रोजी झाले.
Leave a Reply