प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले.
देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली.
मानिनी त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. मानिनी सोडतुझा अभिमान, मजला नसे निवारा, घेई छंद मकरंद , सुरत पियाबिन या नाट्यपदांवर प्रकाश घांग्रेकर यांनी आपला ठसा उमटवला होता.
त्यांना बालगंधर्व पुस्कार व संगीत नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले.
प्रकाश घांग्रेकर यांचे १ एप्रिल २००३ रोजी निधन झाले.
Leave a Reply