सावंत, प्रकाश (बाळा सावंत)

Sawant, Prakash (Bala Sawant)

Bala Sawant

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते तसंच ठाकरे कुटुंबियांचे जवळचे स्नेही अशी प्रकाश सावंत उर्फ बाळा सावंत यांची ओळख होती.

मुंबई महापालिकेत सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले सावंत, २००९ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसच्या जनार्दन चांदूरकरांचा पराभव करून सावंत यांनी विजय मिळवला आणि पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे कृष्णा पारकर यांचा पराभव करून दुसर्‍यांदा आमदार होण्याचा मान मिळवला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेचा पाया मजबुत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मनमिळावू स्वभाव, ताळागळातील जनतेशी संवाद आणि त्यामुळे निर्माण झालेला दांडगा जनसंपर्क हे बाळा सावंत यांचा यशाचं सूत्र होते.

८ जानेवारी २०१५ रोजी दिर्घ आजाराने त्यांचे वयाच्या ६४ वर्षी त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी बाळा सावंत यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते.

(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*