प्रमोद हिंदूराव यांनी लोकप्रतिनिधी या आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. ठाणे जिल्हा परिषदेने प्रथम त्यांच्या नेतृत्वाखाली, ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषद उत्तम प्रतिसादामध्ये घेतली होती. शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, आरोग्य संवर्धन, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली विकासकामे अतुलनीय आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामधील अभिजात व निरागस कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी सुरू केलेली निबंध व चित्रकला स्पर्धा अवघ्या जिल्ह्यात चर्चिली गेली.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्या मुलांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणूने त्यांनी अफाट कार्य केले आहे. शाळांमधून बाक सुविधा, तसेच मोफत गणवेष वाटप, दप्तर वाटप, शूज-रेनकोट वाटप ही त्यांची उपलब्धी मानावी लागेल. जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्या गावठाणचे विस्तारीकरण करण्याबाबतची मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे आरोग्याच्या प्रगत सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेला “मोबाईल ओ.पी.डी.” हा अभिनव उपक्रम फारच यशस्वी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रगत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत.
याशिवाय रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे परिषदेचे आयोजन ते सतत करीत होते. त्याच अनुषंगाने माळशेज रेल्वे सुरू करण्याबाबत जागृत रेल्वे प्रवासी परिषदेमार्फत दिल्ली येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्य रेल्वे बोर्डाकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेवून या प्रलंबित प्रस्तावाबाबत चर्चा केली होती.
त्यांनी सिडकोचे अध्यक्षपदह भूषविले आहे.
<!– दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित –>
Leave a Reply