शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’
शरद पवार यांचे आई शारदाबाई पवार व वडील गोविंदराव पवार हे मुळात सत्यशोधक चळवळीतले सक्रीय कार्यकर्ते. शरद पवार यांच्या लग्नाच्या वेळी या दोघांना हवं होतं ते ते आपल्या मुलाला अनुरूप अशी जोडीदार… बास!
प्रतिभाताईनी मात्र आजोळी बडोद्याला, नंतर पुण्यातील भावे हायस्कूल व महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील एम.ई.एस. कॉलेजातून केले. दोन्ही कुटूंब पुरोगामी विचाराचे असल्यामुळे लग्न जुळवताना अजिबात रुसवे फुगवे झाले नाही. पण तरी सुद्धा मुलीची आई म्हणून निर्मलाताईना धाकधूक होतीच. तेंव्हा त्यानी हळूच शारदाबाईकडे विचारण केली“देण्या घेण्याचं काही बोललात नाही?” अन शारदाबाईनी हसून म्हटलं “नुसतं नेसल्या साडीवर मुलगी पाठवा.
अन पवार बोलू लागले ते काहीसं असं. “आपल्या देशाची परिस्थीत फार हालाखीची आहे हे समजावून सांगताना त्याचं मुख्य कारण ईथली लोकसंख्या आहे. लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी लोकानी स्वत:हून पुढाकार घेत एक किंवा दोन अपत्यावरच थांबावे मी या विचारसरणीचा आहे. ईतराना हा विचार सांगण्याचा व भावी पिढ्यात तो रुजविण्याचा माझा विचार आहे. पण मी जेंव्हा लोकांपुढे तो प्रस्ताव ठेवेण वा विचार मांडॆन तेंव्हा लोकं मला विचारतील. त्यावेळी मला तो विचार मी आधीच कृतीतून उतरविला आहे हे सांगायचे आहे. माझा आदर्श घेत ईथला समाजही अपत्य जन्मावर नियंत्रण घालेल. यातून राष्ट्राची लोकसंख्या आटोक्यात येईल व देशाची भरभराटी होण्यास मोठी मदत होईल.
१ ऑगष्ट १९६७ रोजी बारामतीच्या शाहू हायस्कूलच्या पटांगणात प्रतिभाताई व शरद पवारांचा विवाह संपन्न झाला. देणे घेणे नाही, हुंडा नाही, रुसवे फुगवे नाही… वा मानपान नाही. असा तो साधासुधा लग्नसोहळा होता. बारामतीत त्या दिवशी प्रचंड पाऊस होता, विशेष म्हणजे विवाह समारंभाला सगळ्या पंचक्रोशीतील माणसे उपस्थित होती. आपल्या आमदाराच्या विवाहाला ते सगळे उत्साहाने आले होते.
Leave a Reply