प्रतिक पारखी हा तरूण पुण्याचा रहिवासी असून कला, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारा व्यावसायिक आहे. ‘ओव्हेशन क्रिएशन’ ह्या दृष्यफितींना एडिटींग करून देणार्या लोकप्रिय स्टुडिओचा, समान भागीदार आहे. ऑगस्ट २००९ पासून सुरू झालेला हा स्टुडियो आजवरच्या त्याच्या सर्वात यशस्वी व फायदेशीर जागेवर उभा आहे, व याचं सारं श्रेय जातं ते उत्तुंग प्रतिभेचं व कल्पनाशक्तीचं, अत्यावश्यक भांडवल या स्टुडियोला एकहाती पुरविणार्या प्रतिकला. तंत्रज्ञान व स्वछंदी कलेची योग्य ती सांगड घालणं, त्याला चांगलच ठाऊक आहे.
राजहंस ज्याप्रमाणे दुधातलं पाणी बाजुला काढुन केवळ शुध्द दुध प्राशन करू शकतो, त्याचप्रमाणे प्रतिक देखील त्याला देण्यात आलेल्या दृष्याचा सुवर्ण भाग अबाधित ठेवून उर्वरित भागाला कात्री लावण्यात पटाईत आहे. एडिटींग प्रमाणेच प्रतिकने ग्राफीक डिझायनिंग, वेब मिडिया इत्यादी पुरक कलाक्षेत्रांमध्येही विशेष अभिरूची व गती मिळवली असल्यामुळे यासंबंधीची कामही तो त्याच तन्मयतेने व सफाईदारपणे करीत असतो. तसेच इंडियन क्रिएशन्स हा उपक्रम त्याच्याच महत्वाकांक्षी स्वभावातुन जन्मला असल्यामुळे या स्टुडियोचा जनक म्हणूनही तो आपला कार्यभार सांभाळत आहे. प्रतिकचे शालेय शिक्षण हे न्यु इंग्लिश स्कुल पुणे येथे तर महाविद्यालयीन व पदवी शिक्षण अनुक्रमे एस. पी. कॉलेज, एन. एम. व्ही. ज्युनियर कॉलेज, व टी. एम. व्ही. मिडीया सेंटर येथे झाले.
Leave a Reply